विजयपूर शहरातील सैनिक शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांची देश घडविण्यात अद्वितीय भूमिका आहे. असे कर्नाटक बालविकास अकादमीचे अध्यक्ष संगमेश बबलेश्वर यांनी सांगितले .
त्यांनी विजयपूर शहरातील प्रतिष्ठित सैनिक शाळेला भेट दिली आणि शैक्षणिक व्यवस्थेचा आढावा घेतला आणि दहावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी अनेक यश मिळविणाऱ्यांची कामगिरी मुलांना समजावून सांगितली आणि त्यांना प्रेरणा दिली.
प्राचार्य कॅप्टन प्रतिभा बिस्त व कर्मचाऱ्यांनी सैनिक शाळेत आगमन झालेल्या संगमेश बबलेश्वर यांचे स्वागत व सत्कार केला.


Recent Comments