Vijayapura

उत्तर कर्नाटकावर आणखी एक अन्याय : यासिन जवळी

Share

शासनाच्या आदेशानंतरही कृष्ण भाग्य जल निगमचे कार्यालय अलमट्टी येथे स्थलांतरित न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते यासीन जवळी यांनी संताप व्यक्त केला आहे.

विजयपुर शहरात प्रसारमाध्यमांशी बोलताना उत्तर कर्नाटकात पुन्हा अन्याय होत आहे. यासीन जवळी म्हणाले कि , काँग्रेस सरकारची उत्तर कर्नाटकाप्रती असलेली सावत्र पणाची वृत्ती निंदनीय आहे. सरकारी आदेशानुसार केबीजेएनएल कार्यालय उत्तर कर्नाटकात हलवण्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण मागितले.

जलसंपदा विभागाने विहित मुदतीत स्थलांतराची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अद्यापही बेंगळुरू येथे कार्यरत असल्याबद्दल त्यांनी आक्षेप घेतला. ही प्रक्रिया तातडीने न केल्यास शेकडो शेतकऱ्यांसोबत संघर्ष करावा लागेल, सरकारने उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.

Tags: