Belagavi

रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिर; महेश फाउंडेशन आणि एनकेजीएसबी बँकेचा उपक्रम

Share

महेश फाउंडेशनच्या मायब्लड चॅरिटेबल ब्लड बँक आणि एनकेजीएसबी बँक बेळगाव शाखेच्या वतीने रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणी शिबिर यशस्वी पार पडले. महेश फाऊंडेशनच्या माय ब्लड बँक, एनकेजीएसबी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी एनकेजीएसबी बँक शाखा, बेळगाव येथे रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी एनकेजीएसबी बँकेचे कनिष्ठ अधिकारी प्रसाद गोळी यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगितले. आपत्कालीन परिस्थितीत आणि जुनाट आजारांनी ग्रस्त असलेल्यांना मदत करण्यासाठी रक्तदान आवश्यक आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील दात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले. येथे जमा होणारे रक्त , मायब्लड चॅरिटेबल ब्लड बँक बेळगाव आणि परिसरातील रुग्णांच्या मदतीसाठी वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

एनकेजीएसबी बँकेचे शाखा व्यवस्थापक, मनोहर पै म्हणाले कि , महेश फाउंडेशन, जे वंचित आणि एचआयव्ही पॉझिटिव्ह मुलांच्या कल्याणासाठी ओळखले जाते. इतर आरोग्य उपक्रम हाती घेऊनही त्याचा विस्तार केला आहे. NKGSB ने आज फाऊंडेशन आणि बँक यांच्या संयुक्त विद्यमाने एका शिबिराचे आयोजन केले होते. तरुण पिढीमध्ये रक्तदानाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदानामुळे अडचणीत सापडलेल्या रुग्णांना मदत होते. या शिबिराला एनकेजीएसबी बँकेच्या ग्राहकांचा आणि लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे ते म्हणाले. आरोग्य, नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर एकाच छताखाली घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

वेणुग्राम रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आरोग्य, नंदादीप रुग्णालयाच्या डॉक्टरांनी नेत्रतपासणी, मायब्लड चॅरिटेबल ब्लड बँकेच्या डॉक्टरांनी रक्तदान शिबिरातील रक्तसंकलन केले. या शिबिरात बँकेचे कर्मचारी, ग्राहक आणि स्थानिक नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेऊन स्वेच्छेने रक्तदान केले.

Tags: