खानापूर नगरपंचायतीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी सोमवार, दि २६ ऑगस्ट रोजी निवड प्रक्रिया होणार होती, सदर निवडणुकीत अध्यक्ष व उपाध्यक्ष ही दोन्ही पदे महिलांसाठी राखीव होती, मात्र आरक्षणात भेदभाव केल्याचा आरोप पुढे आल्याने, याप्रकरणी उच्च न्यायालयाने निवडणुकीला स्थगिती दिली आहे.
सोमवार दि. 26 ऑगस्ट रोजी खानापुर नगरपंचायतीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाली होती.. या निवडणुकीत दोन्ही पदे महिला आरक्षित ठेवण्यात आली होती. नगरपालिका सदस्य लक्ष्मण मादार यांनी आरक्षणात भेदभाव झाल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने उच्च न्यायालयाने याप्रकरणी हस्तक्षेप करत निवडणूक प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. यावर पुढील सुनावणी २९ ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती नगपालिका सदस्य लक्ष्मण मादार यांनी दिली.
या आदेशाची प्रत आज लक्ष्मण मादार यांनी खानापूरचे तहसीलदारयांच्याकडे सुपूर्द केली आहे. खानापूर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी गेल्या काही वर्षांपासून अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण नसल्याने आमच्या समाजावर अन्याय होत आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी मी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली आहे.
Recent Comments