बेळगावच्या टिळकवाडी येथील शुक्रवार पेठ येथील रहिवासी उषा गोपाळकृष्ण कामत (८५) यांचे नुकतेच निधन झाले, त्यांच्या इच्छेनुसार कामत कुटुंबीयांनी डॉ. रामण्णवर चॅरिटेबल ट्रस्ट बैलहोंगल यांच्यामार्फत त्यांचे नेत्र त्वचा व देहदान केले.
त्यांचे नेत्र केएलई डॉ प्रभाकर कोरे हॉस्पिटल आय बँकेला आणि त्वचा स्किन बँकेला दान करण्यात आली
आणि के एल इ च्या बी एम कंकणवाडी आयुर्वेद मेडिकल कॉलेजला देहदान करण्यात आला .
प्राचार्य, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी हात जोडून धन्वंतरी प्रार्थनेचे मंत्रोच्चार करून मृतदेह स्वीकारला .
प्राचार्य डॉ. सुहास कुमार शेट्टी, प्राध्यापक आणि शरीरशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. महांतेश रामण्णवर यांनी नेत्र, त्वचा आणि शरीर दान केल्याबद्दल कामत कुटुंबियांचे कृतज्ञता आणि आदर व्यक्त केला.
दिवंगत उषा कामत यांच्या पश्चात दोन मुली आहेत.


Recent Comments