Chikkodi

रस्त्यांच्या विकासातून आर्थिक प्रगती साधता येईल : खासदार प्रियांका जारकीहोळी

Share

रस्त्यांच्या विकासातून उत्तम संपर्क साधता येणे आणि यातून आर्थिक प्रगती साधने शक्य होईल, असे मत खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी व्यक्त केले.

यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघातील हुदली गावांतर्गत हुदली-कुमरी गावाला जोडण्यासाठी 1 कोटी 65 लाख. 3 किमी रस्त्याचे डांबरीकरण आणि ड्रेनेजच्या कामाचा शुभारंभ तसेच गणपती मंडपाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघात ९० टक्के गावांना जोडणारे रस्ते विकसित करण्यात आले असून अधिकाधिक रस्त्यांच्या विकासाला प्राधान्य दिले जाईल असे त्या म्हणाल्या. लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आणण्यासाठी कार्य केलेल्या हुदली जिल्हा पंचायतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले.

यावेळी खासदार प्रियांका जारकीहोळी यांचा हुदली ग्रामपंचायतीच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्र्यांचे निकटवर्तीय अरविंद कारची, हुदली ग्रामपंचायतीचे अध्यक्ष – उपाध्यक्ष, गावातील नेतेमंडळी आणि ज्येष्ठ व्यक्ती आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: