Kagawad

राज्य सरकार शिक्षणावर अधिक भर देत आहे; याचा लाभ घ्या : आमदार राजू कागे

Share

राज्य सरकार शिक्षण क्षेत्राला सर्व प्रकारची मदत व सहकार्य करत आहे. वर्गखोल्या बांधणे, गणवेश देणे, यासह विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची शुद्ध व्यवस्था तसेच सर्वतोपरी मदत व सहकार्य केले जात असल्याने याचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी चांगले शिकावे व शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांची शिक्षण व्यवस्था व्यवस्थित करावी, असे आवाहन कागवाडचे आमदार राजू कागे यांनी केले.

शिरगुप्पी गावातील शासकीय हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारी 17.75 लाख रु. खर्च करून बांधलेल्या शाळेच्या इमारतींचे उद्घाटन केल्यानंतर आमदार राजू कागे यांनी शाळेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.

समारंभात मुख्याध्यापिका उज्वला मगदुम यांनी स्वागत व माहिती दिली. कार्यक्रमाला माध्यान्ह आहार नियंत्रण अधिकारी मल्लिकार्जुन नामदार , क्षेत्रशिक्षण अधिकारी विभागीय अधिकारी पांडुरंग मदभावी , सुभाष पाटील, पंडित वड्डर, राजू चौघुले आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags: