Belagavi

कर्ले गावच्या माजी ग्राम पंचायत सदस्याचा निर्घृण खून

Share

बेळगाव तालुक्यातील कर्ले गावात माजी ग्राम पंचायत सदस्याचा भर रस्त्यात निर्घृण खून झाल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.

कर्ले येथील माजी ग्रामपंचायत सदस्य असलेले मोहन तलवार हे सोमवारी दुपारी किणये येथून कर्ले च्या दिशेने दुचाकीवरून येत होते. त्यावेळी अनोळखी हल्लेखोरांनी मोहन यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी मानेवर वार केल्याने भर रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात कोसळले .

त्यावेळी काही जणांनी या घटनेची माहिती पोलिसांना व मोहन यांच्या घरी दिली . घराच्या सदस्यांनी त्या ठिकाणी येऊन गंभीर जखमी मोहन यांना बीम्स मध्ये उपचारासाठी नेले . मात्र प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने , मोहन यांचा मृत्यू झाला होता .

घटनेनंतर या भागात भीतीचे वातावरण पसरले होते. सोमवारी रात्री डीसीपी रोहन जगदीश, ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली . हा हल्ला कोणी केला व कशासाठी केला याचा तपास बेळगांव ग्रामीण पोलीस करत आहेत. ग्रामीण पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे

Tags: