Belagavi

185 वा जागतिक फोटोग्राफी दिन; बेळगावात आरोग्य तपासणी शिबिर

Share

 

बेळगाव शहर व तालुका फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम यांच्या वतीने 185 व्या जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त मोफत नेत्र व कान तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

185 व्या जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त बेळगाव शहर व तालुका फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी बेळगाव येथील वाङ्मय चर्चा मंडळ सभागृहात मोफत नेत्र व कान तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामाचे अध्यक्ष विनयकुमार बाळिकायी , सचिव लतेश पोरवाल, बेळगाव शहर व तालुका फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष डी.बी.पाटील, अमित पवार, बाळू सांगुकर, सचिन गोवेकर आदी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष विनयकुमार बाळिकायी यांनी मार्गदर्शन केले. फोटो काढणे हा काहींचा छंद असेल पण तो फोटोग्राफरचा व्यवसाय आहे. छायाचित्रकाराचे समर्पण असावे. त्यांनी टिपलेल्या दृश्यांमध्ये ते वेगळे दिसले पाहिजे. फोटोग्राफी ही एक अद्भुत कला असल्याचे ते म्हणाले.

डॉ. नीता देशपांडे, मेघना नायक, पवार आणि मधु नायक यांनी छायाचित्रकारांची नेत्र व कान तपासणी करून योग्य मार्गदर्शन केले.
यावेळी हरिभाऊ पाटील, सुरेश बडवे, शरद गुहागरकर, उमेश पाटील आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संजय हिशोबकर, नामदेव कोळेकर, अन्वर बेग, नितीन महाले, भरमा मोटरे आदींचा सहभाग होता.

Tags: