मराठा समाज बांधवांच्या हितोन्नतीसाठी संघटीत प्रयत्न करणे आज काळाची गरज आहे, असे मत मराठा समाजातील युवा नेते किरण जाधव यांनी व्यक्त केले.
मराठा आरक्षण गणना 3 ब मधून 2 अ मध्ये व्हावी यासह समाज बांधवांच्या हितोन्नतीसाठी च्या अनुषंगाने असणाऱ्या मागण्यांमध्ये एकवाक्यता असावी, यासाठी शनिवारी सायंकाळी 5 वाजता बेळगाव शहरातील एका खाजगी हॉटेलच्या सभागृहात बेळगाव उत्तरमधील मराठा समाजातील प्रमुख मान्यवरांची चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मराठा समाजाचे युवा नेते किरण जाधव यांनी मार्गदर्शन केले . .
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वीर शिवाजी सेना कर्नाटक राज्याचे अध्यक्ष कमलेशराव फडतरे ( बेंगळुर ) उपस्थित होते. बैठकीत कमलेशराव फडतरे यांनीही मराठा समाजाच्या उन्नतीसाठी मराठा समाजबांधवांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत, असे सांगितले.
याप्रसंगी सुनील जाधव, राहुल मुचंडी, राजन जाधव, सीमा पवार, प्रज्ञा शिंदे, प्रवीण पाटील यासह उत्तरमधील इतर मराठा समाजबांधव उपस्थित होते.
Recent Comments