Politics

मी माझ्या मालमत्तेचा तपशील देईन.. तुम्हीपण द्याल का? डीकेशींचे कुमारस्वामींना आव्हान

Share

केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात परस्पर विरोधी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून आपल्या कुटुंबाच्या मालमत्तेचा तपशील विचारणाऱ्या कुमारस्वामींनी आदी स्वतःच्या भावाच्या मालमत्तेचा हिशोब जाहीर करावा असे खुले आव्हान डीकेशींनी दिले आहे.

बेंगळुरू येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केंद्रीय मंत्री कुमारस्वामींना खुले आव्हान देत माझ्या मालमत्तेचा हिशोब करण्यापूर्वी कुमारस्वामी अधिकारात असताना त्यांच्या भावाने अधिकाराचा दुरुपयोग करून किती मालमत्ता जमवली याचा आधी हिशोब करावा आणि त्यानंतर कोणत्याही दडपणाशिवाय आपण आपल्या मालमत्तेचा हिशोब देऊ असे ते म्हणाले.

कुमारस्वामींच्या म्हणण्याप्रमाणे लोकशाहीत प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार असेल तर यानुसार आधी त्यांच्या भावाच्या मालमत्तेबद्दल त्यांना उत्तर देऊ द्या. जेडीएस आणि भाजपाला घोटाळ्याबाबत उत्तर देण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी अद्याप उत्तर दिलेले नाही. बी. वाय. विजयेंद्र यांच्या म्हणण्यानुसार आपण भ्रष्टाचाराचे पितामह आहोत. असे असेल तर मग तुम्ही तुमच्या वडिलांना कारागृहात का पाठविले? याचा हिशोब आधी तुम्ही करा.. तुमच्या पक्षातील यत्नाळ, गोळीहट्टी शेखर यांना उत्तरे द्या मग आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ असा टोलाही त्यांनी लगावला.

Tags: