Belagavi

अलतगाजवळ मार्कंडेय नदीत वाहून गेलेल्या तरुणाचा सापडला मृतदेह

Share

काल रात्री दुचाकीसह दुचाकीवरील दोघे तरुण नाल्यात घसरून पडले . त्यापैकी एकजण बचावला असून दुसऱ्या तरुणाचा मृतदेह आज बेळगाव अलतगा क्रॉसजवळ सापडला .
काल रात्री बेळगाव तालुक्यातील अलतगा गावातील ज्योतिनाथ पाटील व ओंकार पाटील हे दोन युवक दुचाकीवरून कंग्राळी खुर्द गावात येत होते. यावेळी दुचाकी घसरल्याने दोघेही दुचाकीसह नाल्यात पडले. पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असताना ज्योतिनाथ या तरुणाने झाडाला धरले आणि पोहत किनाऱ्यावर आला . मात्र, पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेला त्याचा चुलत भाऊ ओंकार याचा मृतदेह दुपारी एसडीआरफ जवानांच्या हाती लागला .कालपासून ओंकारची शोधमोहीम सुरु होती . सकाळपासून
एसडीआरएफचे पथक मार्कंडेय नदीच्या पात्रात वाहून गेलेल्या ओंकाराचा शोध घेत होते . अखेर आज दुपारी त्यांच्या हाती ओंकाराचा मृतदेह लागला .

या दुर्घटनेतून सुखरूप बचावलेल्या ज्योतिनाथ पाटील यांने घटनेची माहिती दिली.


या घटनेला येथील अरुंद रस्ता कारणीभूत असल्याचा आरोप कंग्राळी खुर्द व अलतगा येथील ग्रामस्थांनी केला आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली आहे. मात्र, जिल्हा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कंग्राळी खुर्दचे ग्रामस्थ टी.डी.पाटील यांनी केला. असे अपघात पुन्हा होऊ नयेत यासाठी रस्त्याचे रुंदीकरण लवकर करावे, अशी मागणी त्यांनी केली.

केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, बेळगावी जिल्ह्याचे प्रभारी मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांचे जवळचे मित्र यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. कुटुंबीयांशी बोलून त्यांचे सांत्वन केले. येत्या काही दिवसांत या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गातही रुपांतर होत आहे. या रस्त्याचे रुंदीकरण लवकरच करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

यावेळी शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानियांग, डीसीपी पी.व्ही. स्नेहा यांच्यासह अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते . डॉ . हिरेमठ यांच्या एस डीआरएफ पथकातील जवानांनी मृतदेह बाहेर काढला, पंचनामा करण्यात आला आणि मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. यावेळी कुटुंबीयांच्या दु:खाने कळस गाठला.

Tags: