M K HUBLI

एमके हुबळी शहरातील गंगाबिका मंदिर पूर्णपणे जलमय होण्याच्या मार्गावर

Share

बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील एमके हुबळी शहरातील गंगाबीका मंदिर पश्चिम घाटातील पावसामुळे पूर्णपणे जलमय होण्याच्या मार्गवर आहे . ओसंडून वाहणाऱ्या मलप्रभा नदीच्या पाण्याने हे मंदिर अर्ध्याहून अधिक पाण्याखाली गेले आहे .

पूर्वीच्या काळी करण्यात आलेली , बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील एम.के. हुबळी शहरातील गंगाबीका मंदिराच्या कळसावर बसून कावळा बसून पाणी पिईल ही भविष्यवाणी आता खरी ठरताना दिसत आहे.

बेळगाव जिल्ह्यातील खानापुर तालुक्यातील कणकुंबी येथे उगम पावलेल्या आणि कूडलसंगम मध्ये सामील झालेली मलप्रभा नदी आता दुथडी भरून वाहत आहे . एमके हुबळी शहरातील गंगाबिका मंदिराचा अर्ध्याहून अधिक भाग पाण्याखाली गेला आहे. मलप्रभा नदीवरील खालचा पूल पूर्णपणे जलमय झाला असून सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. हजारो एकर जमिनी पाण्याखाली गेली आहे . मलप्रभा नदी सवदत्ती मुनवल्लीजवळील नवलतीर्थ जलाशयालाही जाऊन मिळते.

Tags: