बार काउंटरसमोरील काचेवर पडून बार सप्लायरचा मृत्यू झाल्याची घटना खानापूर येथे घडली.

खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसजवळील शांतीसागर बार आणि रेस्टॉरंटमध्ये बार सप्लायर म्हणून काम करणाऱ्या 72 वर्षीय व्यक्तीचा काल सायंकाळी हॉटेलच्या काउंटरसमोरील काचेवर पडून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी खानापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हलकर्णी मराठी शाळेजवळ राहणारी मयताची मुलगी निकिता प्रवीण खतोरे हिने वडिलांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करत खानापुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खानापुरचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांनी पोलीस पुढील तपास करत असल्याचे सांगितले .
Recent Comments