मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या बेळगाव महापालिकेच्या हेल्पलाइनवर संपर्क साधूनही मदत मिळत नसल्याबद्दल जनतेतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे .
बेळगाव जिल्ह्यात गेल्या 1 आठवड्यापासून सतत पाऊस पडत आहे. शहरातील विविध भागात दुरवस्था होत आहे. अनेक ठिकाणी ड्रेनेज, गटारी तुडुंब भरली असून पावसाचे पाणी लोकांच्या घरात शिरले आहे. बेळगावातील आझाद नगर येथील सलाउद्दीन निजामुद्दीन मुल्ला या गरीब वृद्धाच्या घरात पाणी शिरले आहे. घरातील वस्तू पाण्यात तरंगत आहेत. पावसाच्या पाण्यामुळे कुटुंबीयांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. घराच्या भिंतीचेही नुकसान झाले. महापालिकेच्या हेल्पलाइनवर संपर्क साधला असता, पुरेशी सेवा मिळत नसल्याबद्दल सलाउद्दीन निजामुद्दीन मुल्ला यांनी नाराजी व्यक्त केली.


Recent Comments