वडगाव भागातील महानगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या नाल्यावर बेकायदेशीर रित्या शेड बांधण्यात आले होते. सदर अतिक्रमित शेड आज मनपाच्या वतीने हटविण्यात आले आहेत.

बेळगावच्या अनगोळ, भाग्यनगर, आदर्शनगर समृद्धी कॉलनी, आनंदनगर, वडगावमधून वाहणाऱ्या आनंदनगर वडगाव या नाल्यावरील अतिरकामाने आज मनपाने हटविली. बेकायदेशीरपणे बांधलेल्या शेड्समुळे अनेक समस्या उद्भवत असून आज अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत सदर शेड हटविण्यात आले. मनपा अधिकारी लक्ष्मी निपाणीकर यांच्या नेतृत्वाखाली सदर कारवाई करण्यात आली. मात्र या कारवाईनंतर शेडमध्ये राहणारे नागरिक रस्त्यावर आले आहेत.
पावसाळ्यात या भागातील सुमारे ४० घरांमध्ये पाणी शर्ट असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. याला कारणीभूत असणाऱ्या नाल्यावरील बेकायदेशीर आणि अतिक्रमित शेड हटविणे गरजेचे होते. सदर शेड हटविण्यासाठी अनेक मागण्या करण्यात येत होत्या. यासाठी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अतिक्रमण झालेल्या शेड हटविण्यात आल्या. यादरम्यान शेडमध्ये राहणाऱ्या कुटुंबीयांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये वादावादीचे प्रकार घडले.

विविध ठिकाणाहून बेळगावात कामासाठी आलेले हे नागरिक ४५ वर्षांपासून येथे राहत आहेत. शेड हटविण्यासाठी कोणतीही पूर्वसूचना न देता अधिकाऱ्यांनी आज अचानक येऊन शेड हटविले. आता पावसाळ्यात आपण, आपली मुले रस्त्यावर आली आहेत, अशी व्यथा येथील महिलेने मांडली.
नाला एकदिशेने वाहतो. मात्र कारवाई दुस्याच ठिकाणी करण्यात आली. यापूर्वी हा नाला दुसऱ्या दिशेने वाहात होता. भाग्यनगर आणि आदर्षनगर भागातून शंकर चौगुले यांच्या शेतातून हा नाला पुढे जात होता. नाला ज्या भागातून वाहतो त्या भागाचा सर्व्हे नंबर दुसरा आहे. मात्र अतिक्रमण दुसऱ्याच जागेवरच हटविण्यात आले आहे. मनपा अधिकारी कोणाच्या तरी दडपणाखाली काम करत आहेत. याकडे जिल्हा पालक मंत्री, जिल्हाधिकारी आणि शहर पोलीस आयुक्तांचे लक्ष वेधणे गरजेचे आहे असे मत माजी नगरसेवक अनिल गंगाधर पाटील यांनी व्यक्त केले.


Recent Comments