मृत्यूनंतर मृतदेह पुरण्याऐवजी किंवा जाळण्याऐवजी देहदान करून गरजूंचे जीवन उजळ्वता येते. तसेच वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याची माहिती केएलईचे संचालक डॉ. महांतेश कवटगीमठ यांनी दिली.
आज राधास्वामी सत्संग आणि वेदांत फाउंडेशनच्या वतीने देहदान संकल्प सोहळा पार पडला. यामध्ये सत्संगातील 75 जणांनी एकाच वेळी देहदानाची प्रतिज्ञा घेतली.
यावेळी बोलताना महांतेश कवटगीमठ म्हणाले, मृत्यूनंतर मृतदेह पुरण्याऐवजी किंवा जाळण्याऐवजी देहदान करून गरजूंचे जीवन उजळविता येते. तसेच वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या एमबीबीएस विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकतो. वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत असलेल्यांना जीव वाचवण्यासाठी वेदांत फाऊंडेशनने हाती घेतलेले हे कार्य आदर्श असल्याचे कवटगीमठ यांनी म्हणाले.

माजी प्राचार्य डॉ. डी.एन.मिसाळे, राधास्वामी संघटनेचे नेते शिवाजीराव केदनुरकर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. वेदांत फाऊंडेशनने देहदानासदंर्भात जनजागृती करण्यासाठी केएलई संस्थेशी समन्वय साधला असून या माध्यमातून मागील वर्षी ७० शिक्षकांनी देहदान संकल्प करून विक्रम केला. यंदा ७५ जणांनी देहदानाचा संकल्प केला आहे. यावेळी देहदानाचा संकल्प केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अंजुदेवी केदनुरकर, सविता चंदगडकर, सोनिया पाटील, शोभा पाटील, सुजाता लोखंडे, अनुराधा तारिहाळकर आदी उपस्थित होते..


Recent Comments