बेळगाव जिल्हा शिवसेना सीमाभाग उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवा सेना यांच्या वतीने सालाबादप्रमाणे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.

धर्मवीर संभाजी महाराज चौकात बेळगाव जिल्हा शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, उपशहरप्रमुख राजु तुडयेकर, उपशहरप्रमुख प्रकाश राऊत, संघटक तानाजी पावशे यांच्या हस्ते छत्रपती श्री संभाजी महाराज मुर्तीला पुष्पहार अर्पण करुन पुजन करण्यात आले.
यावेळी युवासेनेचे विनायक हुलजी, चेतन शिरोळकर, संकेत कडगांवकर, विठ्ठल हुंदरे, अमर कडगांवकर, अमृत शिरोडकर, प्रदिप सुतार, जोतीबा मल्लाप्पा चौगुले, सचिन नेसरगी, अनिकेत जोतीबा चौगुले, महेश चौगुले, गणेश पत्तार, भावेश कोलेकर, मधुकर यल्लाप्पा इंगोले व अनेक शिवसैनिक उपस्थित होते.


Recent Comments