EVENT

उगार येथे खा . प्रियांका जारकीहोळी यांचा सत्कार

Share

 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या प्रियंका जारकीहोळी यांचे प्रथमच उगार येथे आगमन होताच आमदार राजू कागे, शिवगौडा कागे, माजी आमदार मोहनराव शहा, राहुल शहा.यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचा भव्य सत्कार केला.
मंगळवारी सायंकाळी उगार शहरातील शिवगौडा कागे यांच्या घरी राजू कागे, शिवगौडा कागे, प्रसाद कागे यांच्या कुटुंबीयांनी नवनिर्वाचित काँग्रेसच्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांचे भव्य स्वागत करून सत्कार केला.
त्यानंतर आमदार राजू कागे यांनी प्रियांका जारकीहोळी व राहुल जारकीहोळी यांचा जनतेतून सत्कार केला.

 


कागवाड मतदारसंघाचे माजी जिल्हा पंचायत सदस्य विनायक बागडी , रवींद्र पुजारी, ब्लॉक अध्यक्ष विजय अकिवटे यांच्यासह अनेक महिला सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
आमदार राजू कागे यांनी बोलताना चिक्कोडी लोकसभा मतदार संघातून निवडून आलेल्या खासदारांची माहिती दिली . या सर्वांची निवड करण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे, आणि आम्ही जिंकलो. लोक प्रतिभावान असतात आणि त्यांच्या कोणत्याही महत्वाकांक्षा नसतात, त्यांना चांगला सन्मान मिळणे आवश्यक आहे, तुम्ही सर्वांना भेटून त्यांचे काम केले तर पुरेसे आहे, असे ते म्हणाले.

कागवाड मतदार संघातील सर्व मतदारांची मी ऋणी आहे, असे खासदार प्रियांका जारकीहोळी म्हणाल्या .
उगार बुद्रूक गावात माजी आमदार मोहनराव शहा यांच्या नेतृत्वाखाली प्रियंका जारकीहोळी यांचा सत्कार करण्यात आला.

Tags: