मागील २० वर्षांपासून विकासापासून वंचित असलेल्या खानापूर तालुक्यातील सर्व रस्त्यांचा विकास करावा अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते जोतिबा भेंडिगेरी यांनी नूतन खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी याना दिले .

बेळगाव-तळगुप्प राज्य महामार्गावरील खानापूर ते लिंगनमठ हा मुख्य रस्ता अनेक वर्षांपासून विकासापासुन वंचित असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे . आता पावसाळा सुरू झाला असून, खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने , त्या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक लहानमोठे अपघात होत आहेत.
या रस्त्यांवरून प्रवास करताना वाहनधारक आणि प्रवाशांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत . गेल्या 20 वर्षात खानापूर तालुक्यातील एकाही रस्त्याचा विकास झालेला नाही. सदर राज्य महामार्ग हा मुख्य महामार्ग असल्याने त्याचे डांबरीकरण न केल्याने खानापूरचे सौंदर्यही बिघडले आहे.
विकासापासून तालुका वंचित राहिल्याने , तालुक्यातील जनतेचा खासदार व लोकप्रतिनिधींवरील विश्वास उडाला आहे. , त्यामुळे विद्यमान खासदारांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन बेळगाव ते तळगुप्प राज्य महामार्गावरील खानापुर-लिंगनमठ ह्या मुख्य रस्त्याचा लवकरात लवकर विकास करावा असे आवाहन करून , खानापुर येथील सामाजिक कार्यकर्ते ज्योतिबा भेंडिगेरी यांनी नूतन खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांना निवेदन दिले .
त्याचप्रमाणे तालुक्यात अनेक प्रसिद्ध ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळे असल्याने लोकांच्या माहितीसाठी महामार्गावर फलक लावावेत असा आग्रह देखील निवेदनाद्वारे केला आहे .


Recent Comments