मंत्री सतीश जारकीहोळी आणि आमदार लक्ष्मण सवदी यांच्यातील शाब्दिक वादावर पडदा पडत असल्याची चिन्हे दिसत असतानाच आता त्यांच्या चाहत्यांकडून नवनवे वाद उकरून काढले जात असल्याचे चित्र दिसत आहे.

भाजपचे माजी आमदार महेश कुमठळ्ळी यांचा बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या घरी उभारल्याचे छायाचित्र वायरल झाले असून आमदार लक्ष्मण सवदी समर्थकांनी मात्र जारकीहोळींचे याबाबत काय म्हणणे आहे? असा प्रश्न उपस्थित करत संतप्त प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. माजी आमदार महेश कुमठळ्ळी हे जारकीहोळी कुटुंबियांचे स्नेही आहेत. या कारणास्तव ते त्यांच्या घरी उपस्थित राहिले असावेत. मात्र त्यांच्या या उपस्थितीमुळे आमदार सवदी समर्थकांमध्ये मात्र नाराजी पसरली असल्याचे दिसून येत आहे.


Recent Comments