पिकांच्या नुकसानीची भरपाई देताना सरकारी परिपत्रकात घालून दिलेल्या निकषांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बेळगाव जिल्ह्यातील महसूल व कृषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी माहिती हक्क कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी केली आहे.
भारत सरकारच्या पीक नुकसान भरपाई देण्याबाबत शासन परिपत्रकात घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील महसूल व कृषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई न केल्यास, भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडे तक्रार करण्यासोबतच सरकारच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा माहिती हक्क कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी दिला.
यासंदर्भात महसूल विभागाच्या प्रधान सचिवांनाही पत्र लिहिले आहे. मुदलगी आणि गोकाक तहसीलदार यांच्याकडे पीक नुकसान भरपाई देण्यात आलेल्या शेतकऱ्यांची माहिती, यादी देण्यासाठी अर्ज करण्यात आला. शेतकऱ्यांची माहिती देण्यासाठी तहसीलदार कार्यालयांमध्ये हेल्पलाइन केंद्र सुरू करण्यात आले. मात्र शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळत नसल्याचा आरोप भीमाप्पा गडाद यांनी केला आहे.


Recent Comments