Belagavi

सदाशिवनगरमध्ये पावसाळ्यासाठी खबरदारी घ्यावी : सरला हेरेकर यांचे आवाहन

Share

गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे बेळगावच्या सदाशिवनगरमध्ये अनेकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेविका सरला हेरेकर यांनी मनपाला सदाशिवनगर भागात लक्ष पुरविण्याचे आवाहन केले आहे.

सदाशिवनगर मध्ये सांडपाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे लोकांना त्रास होत आहेत. पावसाळ्यात हि समस्या अधिक वाढते. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करण्याची विनंती सरला हेरेकर यांच्यासह बी.आर. सलीमठ, श्रीशैल पाटील आणि शंभू पाटील यांच्यातर्फे मनपा अभियंते सिद्धगौडा आणि एसी उदयकुमार यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना सरला हेरेकर म्हणाल्या, सदाशिवनगरमध्ये पावसामुळे गटारातुन पाणी ओव्हरफ्लो होते. अनेक ठिकाणी गटारी तुंबल्याने पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी सदाशिवनगर येथील शालेय विद्यार्थ्यांना याच पाण्यातून वाढ काढत जावे लागते. येथील अपार्टमेंटसाठी ड्रेनेजची योग्य व्यवस्था नसल्याने पाणी रस्त्यावरून वाहत आहे. यामुळे या भागाकडे मनपाने लक्ष पुरवावे असे आवाहन त्यांनी केले.

Tags: