RAIN

कालव्याचे काम अर्धवट राहिल्याने पावसाचे पाणी शेतात

Share

विजयपूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बसवन बागेवाडी शहरातील टक्कळकी शाखा कालवा फुटून मोठ्या प्रमाणात पाणी शेतकऱ्यांच्या जमिनीत शिरून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

टक्कळकी येथील मुख्य कालव्याचे काम पूर्ण न झाल्याने ते अर्धवटच थांबले आहे. गेल्या 4-5 वर्षांपासून बसवन बागेवाडीत बांधण्यात येत असलेल्या या कालव्याचे काम अद्यापही अर्धवट स्थितीत असून यामुळे पावसाचे पाणी शेतकऱ्यांच्या जमिनीत शिरत आहे. पावसामुळे शेतजमिनीत पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून हे कामकाज तातडीने पूर्ण करून शासनाने आम्हाला दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी महांतेश आगसरा यांनी केली आहे.

Tags: