रायबाग तालुक्यातील बावनसौंदत्ती गावातील विद्यार्थ्यांनी NEET परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल कल्लाप्पाण्णा काटे सहकारी संस्था आणि अष्टविनायक पीकेपीएस संस्थेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना युवा नेते चेतन काटे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत, गावातील विद्यार्थ्यांनी असेच यश संपादन करून उच्च पदावर जाऊन गाव व तालुक्याचे नाव उज्वल करावे, स्पर्धात्मक युगात यश मिळणे उत्तमच आहे. गावातील अनेक तरुण विविध क्षेत्रात यश मिळवत आहेत. ज्येष्ठ आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेऊन यापुढील काळातही यश संपादन करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
रायबाग तालुक्यातील बावनसौंदत्ती गावातील समेद टिक्के याने 664, आदर्श हांजे याने ६४३, आदर्श कामगौड याने 640, आयुष मगदूम याने 590 आणि ओंकार कांबळे याने ५३६ गुण मिळवत NEET परीक्षेत यश संपादित केले असून या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष रामचंद्र काटे, अनिल हंजे, आदिराज पाटील, अरुण शिंदे, भरत लोटे, बाहुबली जनाज, गणपती काटे, आण्णाप्पा खोत, सुभाष मंगसुळे, सुभाष हंजे, सुरेश काटे, वसंत जाधव, जयसिंगराव देसाई, संजू यमराजे, बाहुबली जनाज, राजू बपकर, लक्काप्पा आंबी, विनोद हिरेमठ, राजू सिंगाडे आदी उपस्थित होते.


Recent Comments