तालुका आरोग्य अधिकारी एस.एस. सिद्दन्नावर यांनी कित्तूर येथील बोगस डॉक्टर अब्दुल लाड खान यांच्या घरी भेट दिली.

एका महिन्याच्या नवजात बालकाचा दीड लाख रुपयांचा व्यवहार करून बेकायदेशीरपणे विक्री केल्याप्रकरणी आज पाच जणांना अटक करण्यात आली असून यातील प्रमुख आरोपी असणारे बोगस डॉक्टर अब्दुल लाड खान यांच्या घराचा लिलाव करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आज तालुका आरोग्य अधिकारी एस.एस.सिद्दन्नावर यांनी कित्तूर येथील बोगस डॉक्टर अब्दुल लाड खान यांच्या घरी भेट देऊन तपासणी केली. यावेळी या भागातील नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी व त्यांच्या घराचा लिलाव करण्यात यावा अशी मागणी केली.


Recent Comments