धर्मस्थळ ग्राम विकास योजनेच्या वतीने तालुक्यातील चमकेरी गावातील शासकीय कन्नड वरिष्ठ प्राथमिक कन्नड शाळेत जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युनियनच्या अध्यक्षा महादेवी गौंडी होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन करताना धर्मस्थळ ग्राम विकास योजनेच्या जिल्हा संचालिका नागरत्ना हेगडे यांनी झाडे तोडल्याने आपल्याला होणारे तोटे याबाबत सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमात तालुका नियोजन अधिकारी .रजब अली, .शिवाजी कवटे , शाळेचे शिक्षक अमर मडीवाळ , गावचे वैद्यकीय अधिकारी, डॉ.एस.बी.कागवाड , विठ्ठल मंदिर प्रमुख, पंडित सूर्यवंशी रमेश कांबळे, तालुका कृषी अधिकारी शिवनगौडा पाटील, विभागीय पर्यवेक्षक सहभागी झले होते . कार्यक्रमात शौर्य आपत्ती व्यवस्थापन पथकाचे प्रतिनिधी व सदस्य प्रदीप यांनी उपस्थित 50 लोकांना रोपांचे वाटप केले


Recent Comments