Khanapur

मनरेगा कामगारांचा लोकोळी ग्रामपंचायत कार्यालयाला घेराव

Share

 

खानापूर तालुक्यातील लोकोळी ग्रामपंचायतीमध्ये नरेगा कामगारांसोबत भेदभाव केल्याचा आरोप करत मनरेगा कामगारांनी ग्रामपंचायत कार्यालयाला घेराव घालून आंदोलन केले.

खानापूर तालुक्यातील लोकोळी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या लोकोळी, लक्केबैल, जैनकोप्प, एडोगा, बालोगा, दोड्डहोसूर या गावांमध्ये नरेगाची कामे करण्यात येत असून कामगारांना मजुरी देताना भेदभाव केल्याचा आरोप होत आहे. याविरोधात आज लोकोळी ग्रामपंचायतीसमोर आंदोलन करत मजुरांनी कार्यालयाला घेराव घातला. यासंदर्भातील निवेदन देखील ग्रामपंचायतीकडे सादर करण्यात आले.

३४९ रुपये प्रतिदिन मजुरी असूनही केवळ २०० रुपये मजुरी देण्यात येत असल्याचा आरोप मनरेगा कामगारांनी केला आहे. सदर बाब तालुका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलीअसून संबंधितांवर कारवाई करून न्याय मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी राजशेखर हिंडलगी, डीएसएस समन्वयक जिल्हा सरचिटणीस राघवेंद्र चलवादि, ज्योतिबा बेंडीगेरी, लक्ष्मण भावने, धर्मराज चलवाडी, लक्ष्मी शिवाजीराव बादरे, शारदा गुरव, सरिता गुरव यांच्यासह दोनशेहून अधिक मजूर सहभागी झाले होते.

Tags: