तरुणीच्या वादावरून दोन कुटुंब रस्त्याच्या मधोमध चाकू आणि लोखंडी साखळ्या घेऊन भांडत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हुबळी येथील गब्बूर या परिसरातील हा प्रकार असून, एका 22 वर्षीय तरुणीच्या मुद्द्यावरून गब्बूरच्या दोन कुटुंबात यापूर्वी हाणामारी झाली होती. तरूणीच्या बचावासाठी गेलेल्या कुटुंबातील सदस्यावर हल्ला करण्यात आला आणि त्याच भांडणात एकाला चाकूने भोसकण्यात आले. बेंडीगेरी पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत हि घटना घडली आहे.


Recent Comments