पर्यावरण संरक्षण ही आपली जबाबदारी आहे, ती जपली पाहिजे, अशी प्रतिक्रिया बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष एस. एस. किवडसण्णवर यांनी व्यक्त केली. आज बेळगाव जिल्हा न्यायालय आवारात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
बेळगाव जिल्हा न्यायालयाच्या आवारात बार असोसिएशन, विधी सेवा प्राधिकरण व वन विभागाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना बेळगाव असोसिएशनचे अध्यक्ष एस. एस. किवडसण्णवर म्हणाले, माणसाला निसर्गाकडून झाडे, पाणी, हवा, माती, सर्व काही मिळाले आहे. परंतु विकासाच्या नावाखाली निसर्ग नष्ट करण्याच्या दिशेने माणूस जात असून यामुळे केवळ नैसर्गिक संसाधने नष्ट होत नाहीत तर सर्व जलचरांचे जीवन देखील धोक्यात येत आहे. जंगल नष्ट झाल्यामुळे सर्व प्राणी शहराच्या दिशेने येत आहेत. जंगल आणि शेतजमिनी नष्ट होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे अति शहरीकरण. शहरीकरण चुकीचे नाही. त्याऐवजी नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धनासह शाश्वत विकासावर भर दिला पाहिजे, असे ते म्हणाले.
यावेळी न्यायमूर्ती नागलक्ष्मी, ए सी एफ शिवरुद्राप्पा कबाडगी, विनय गौडर, लोकेश, महम्मद किल्लेदार आदींसह वकील संघाचे सदस्य उपस्थित होते.


Recent Comments