Belagavi

एल अँड टी कंपनीला रस्ते दुरुस्तीसाठी १५ दिवसांची मुदत : आम. अभय पाटील

Share

जनतेच्या सोयीसाठी शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याची जबाबदारी एल अँड टी कंपनीला देण्यात आली असून याचे फायदे होण्याऐवजी नुकसानच अधिक होत असल्याची तक्रार करत आमदार अभय पाटील यांनी एल अँड टी कंपनीच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत.

बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. २०१९ साली ५८८ कोटी रुपयांच्या खर्चातून शहराला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी एल अँड टी कंपनीकडे जबाबदारी सोपविली आहे. ६ महिने सर्वे करण्यासाठी वेळ दिला आहे. मात्र अद्याप कामकाज सुरु झाले नाही. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान एल अँड टी कंपनीने कामकाजाचा प्रारंभ केला.

परंतु पाइपलाइनला लागलेल्या गळतीकडे दुर्लक्ष होत आहे. पाईपलाईन घालण्यासाठी खोदण्यात आलेले रस्त्यांची डागडुजी अद्याप करण्यात आलेली नाही. या रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी एल अँड टी कंपनीला १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे, असे अभय पाटील म्हणाले.

Tags: