खरीप हंगामाची कामे शेतकऱ्यांनी सुरु केली असून पेरणी देखील सुरु झाली आहे. मात्र पेरणीदरम्यान खतांचा पुरवठा कमी करण्यात येत असल्याचा आरोप धारवाडमधील शेतकऱ्यांनी केला आहे.
खतांचा मुबलक साठा असूनही शेतकऱ्यांना खतपुरवठा होत नाही. खते ही शेतकऱ्यांची प्रमुख गरज आहे. शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या खतांमध्ये डीएपी खताचा प्रामुख्याने समावेश होतो. मात्र, डीएपी खत उपलब्ध नाही. खत उपलब्ध असले तरी कमी प्रमाणात पुरवठा केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. खतासाठी रांगेत उभे असलेले हे सर्व शेतकरी धारवाड तालुक्यातील विविध गावातील आहेत. येत्या आठवडाभरात पावसाळ्यातील पेरणीच्या कामांना वेग येईल. त्यासाठी शेतकरी धारवाड येथील एपीएमसीजवळील खत वितरण केंद्रासमोर रांगा लावून आवश्यक ते खत घेऊन जात आहेत. सकाळपासून रांगेत उभं राहूनही खत मिळत नसून एका आधारकार्डमागे केवळ 5 पोती खताचे वाटप केले जात आहे. पुरेशा प्रमाणात खत वाटप होत नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.
आवश्यकतेनुसार डीएपी खत उपलब्ध नाही. डीएपीचा पुरवठा कमी आहे. एकरी 2 पोती खत लागते. मात्र, शासनाकडून प्रत्येक शेतकऱ्याच्या आधारकार्डसाठी केवळ 5 पोती खताचे वाटप केले जात आहे. ज्यांच्याकडे 20 एकर जमीन आहे, ते शेतकरी आधार कार्डवर केवळ 5 पोती खत घेणे पुरेसे नसल्याचे सांगत आहेत. खताचा तुटवडा नसल्याचे धारवाड जिल्हा प्रशासन व एपीएमसी चे अध्यक्ष रामण्णा यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या गरजेनुसार खताचा पुरवठा करणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
येत्या आठवडाभरात पावसाळ्यात पेरणीच्या कामाला गती येणार असून शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार खताचा पुरवठा करण्यात यावा यासाठी खत वितरण केंद्रासमोर शेतकरी मोठ्या संख्येने जमा झाले असून मुबलक खतांचे वितरण करण्यात यावे यासाठी शेतकरी फेऱ्या मारत आहेत. जिल्हा प्रशासनाने तातडीने सर्व समस्या सोडवाव्यात आणि शेतकऱ्यांना पुरेसे खत मिळावे याची काळजी घ्यावी, अशी मागणी होत आहे.


Recent Comments