खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांची धांदल सुरु असून याच पार्श्वभूमीवर खत खरेदीसाठी धारवाड मधील शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. मात्र धारवाडमध्ये खतांचा तुटवडा उद्भवल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
शेतकऱ्यांना आवश्यक असलेली डीएपी, युरिया, पोटॅश खते घेण्यासाठी शेतकरी गर्दी करत असून एका आधारकार्डमागे पाच पोती खतांचा पुरवठा करण्यात येत आहे. धारवाड तालुक्यातील विविध गावातील शेतकरी खत खरेदीसाठी बेळगावापासून धारवाड तालुक्यातील एपीएमसी मार्केटमध्ये गर्दी करत आहेत.
मात्र कुंदगोळ शहरातील शेतकरी संपर्क केंद्रात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने खत पुरवठा करण्यास उशीर होत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. खरीप हंगाम ऐन तोंडावर आला असून अपुऱ्या खतपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष पुरवावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याशिवाय बियाणे आणि खतांच्या दरातही वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
Recent Comments