या सरकारने माळी समाजासाठी महामंडळ स्थापन करून आमच्या समाजाला एक एमएलसी जागा देऊन मागासलेल्या समाजाच्या विकासाचे काम करावे, असे समाजाचे ज्येष्ठ नेते डॉ.सी.बी.कुलगोड यांनी सांगितले.

स्थानिक श्री रामलिंगेश्वर मंदिराच्या प्रांगणात अथणी तालुका समस्त माळी समाज व श्री महात्मा ज्योतिबा फुले माळी समाज युवक संघ यांच्या वतीने आयोजित 2024 वर्ष प्रतिभा पुरस्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
आपल्या समाजाच्या हक्कासाठी शक्य तितक्या लवकर बंगळुरू येथील फ्रीडम पार्क येथे सर्व समाजसेवकांना एकत्र आंदोलन करण्याचे आवाहन त्यांनी केले, जोपर्यंत सरकार आमची मागणी पूर्ण करत नाही तोपर्यंत सर्वांनी एकत्र येऊन सामाजिक न्याय मिळवून देऊ.
समितीच्यावतीने 120 हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला,
सचिन बुटाली, गिरीश दिवाणमल, सुरेश कागले, चिदानंद माळी, बी.एस.यादवाड , कल्लाप्पा नरोडे, मृत्युंजय मल्लुखान, चिदानंद माळी. डॉ.आनंद लगाळी उपस्थित होते.
यावेळी महांतेश माळी, संतोष बडकाबी, रवी बडकांबी, प्रशांत तोडकार, रमेश माळी, शिवलिंग बेलंकी, महादेव चमकेरी, रामनिंग बडकांबी, , नागप्पा उगारे, श्रीशैल कागे , शिवराय कागे आदी उपस्थित होते.


Recent Comments