फेसबुक फ्रेंड सर्कलतर्फे बेळगाव येथील महावीर गोशाळेत गायींना चारा वाटप करण्यात आला.
![](https://marathi.innewsbelgaum.com/wp-content/uploads/2024/04/SHIV-OM-copy.jpg)
बेळगावातील महावीर गोशाळेत दीडशेहून अधिक गायी आहेत. दुष्काळामुळे अनेक ठिकाणी जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई निर्माण झाली होती. याची गांभीर्याने दखल घेत फेसबुक मित्र मंडळाने 11 पोती चारा व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
यावेळी संतोष दरेकर , विनायक एल. चंद्रकांत खानोलकर, अवधूत तुडयेकर, सौरभ सावंत, स्वयं पाटील, रोहित रणसुबे आदींचा सहभाग होता.
Recent Comments