कागवाड तालुक्यातील शेडबाळ शहरातील श्री कृष्णा शिक्षण विकास समितीच्या आचार्य सुबलसागर हायस्कुलमधील 2023-24 मधील दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.
![](https://marathi.innewsbelgaum.com/wp-content/uploads/2024/04/SHIV-OM-copy.jpg)
सोमवारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
625 पैकी 624 गुण मिळवून राज्यात दुसरा आलेला सिद्धांत गडगे या विद्यार्थ्याचा त्याच्या पालकांसह सत्कार करण्यात आला.
तसेच शाळेत पृथ्वीराज चौगुला, स्नेहा अगसर, सुष्मिता भुजप्पागोळ , पुनम बडकर, निवास मगदुम, प्रियदर्शिनी भुजप्पागोळ, भूषण मालगावे, नरसगौडा या 95 ते 85 दरम्यान गुण मिळविणाऱ्यांचा त्यांच्या पालकांसह सन्मान करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक पाटील, सचिव जिनाप्पा नांदणी , डॉ. शीतल न्यामगौडा, जैन समाज शाळा महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब कागवाडे , संस्थाचालक संजय पाटील, भरतेश नांद्रे, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, पालक समिती सदस्य, मुख्याध्यापक अमोल पाटील, अविनाश पाटील आदी उपस्थित होते.
Recent Comments