Athani

श्री चंद्रगिरी देवी जत्रा महोत्सव ३ दिवस विविध कार्यक्रम

Share

प्रचंड संख्येने जमलेला भाविक वर्ग, घोड्यांचा नाच, भंडाऱ्याची उधळण , डीजे गाण्यांवर नाचणारी तरुणाई, जुन्या मित्रमैत्रिणींसोबत मस्ती करणारे मित्र, गावाकडची जत्रा पाहायला आलेल्या माहेरवाशिणी हे सारे दृश्य , श्री चंद्रगिरी देवीच्या जत्रेत पाहायला मिळाले . ,

सलग तीन दिवस चालणाऱ्या आदिशक्ती, शक्तीस्वरूपी श्री चंद्रगिरी देवी जत्रा भव्य सोहळ्याच्या साक्षीने, धार्मिक, सांस्कृतिक, कला, साहित्य आणि क्रीडा यांना या जत्रेत उच्च प्राधान्य देण्यात आले.

 

पहिल्या दिवसापासूनच या जत्रेची शोभा वाढली होती, राज्य आंतरराज्यातूनच नव्हे तर परदेशातूनही लोक आपल्या गावी जत्रा पाहण्यासाठी आले होते. वरुणाच्या कृपेने उन्हाळ्यात भरणाऱ्या जत्रेत आणखीनच शीतलता आली आणि दुसऱ्या दिवशी, घोड्यांची शर्यत, सायकल शर्यत, धावण्याची शर्यत, कुस्ती, कोंबड्याची लढत झाली. या सर्व कार्यक्रमांनी भाविकांचे मनोरंजन केले .

Tags: