नेहा व अंजली अंबिगेर यांच्या हत्येचा निषेध करत अथणी शहरात विविध संघटनांतर्फे निदर्शने करण्यात आली.

अंजली अंबिगेर हिच्या निर्घृण हत्येचा राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर निषेध होत असून राज्यभरात विविध संघटनांच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलने करण्यात येत आहेत. आज अथणी शहरात देखील विविध संघटनांनी आंदोलन छेडले होते.
या प्रकरणातील आरोपी गिरीश सावंत याला तात्काळ फासावर लटकवून मृत अंजलीच्या कुटुंबीयांना योग्य मोबदला देण्यासह कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची मागणी राज्य सरकारने तहसीलदारांमार्फत गृहराज्यमंत्र्यांकडे केली आहे.


Recent Comments