भाजपला लोकसभा निवडणुकीत चारशे पार करणे अवघड आहे. त्यामुळे हताश होऊन ते दररोज आपली वक्तव्ये बदलत आहेत, असे सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
बेळगाव शहरातील काँग्रेस भवनात आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री सतीश जारकीहोळी यांनी आमदारांच्या मुलांना तिकीट देण्याच्या मुद्द्यावर बोलताना कोणाला तिकीट द्यायचे आणि कोणाला देऊ नये हा आमच्या पक्षाचा निर्णय आहे. विरोधकांनी विरोध करावा पण कोणाला तिकीट द्यायचे कि नाही, असा सवाल करू नये. ते म्हणाले, भाजपने काश्मीरपासून कन्याकुमारींपर्यंत त्यांच्या मुलांना तिकीट दिले आहे.
दुष्काळाबाबत बोलताना ते म्हणाले की, काही भागात पाऊस पडत आहे.चाऱ्याची समस्या नाही, फक्त पाण्याची समस्या आहे.
टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. महाराष्ट्र सरकारने कर्नाटकला दोन टीएमसी पाणी सोडण्याची विनंती केली आहे. एक टीएमसी पाणी सोडले तरी पाणी समस्या मिटेल .
हिडकल जलाशयातून एक टीएमसी पाणी कृष्णा नदीत सोडण्यात आले असून आणखी एक टीएमसी पाणी सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायती टँकरने पाणी पुरवठा करत आहेत, सुमारे 400 पंचायती पाणी पुरवठा करत आहेत मात्र सुमारे शंभर पंचायतींनी टँकर घेतलेले नाहीत. ज्या ग्रामपंचायतींनी टँकर घेतले नाहीत त्यांना पाणीपुरवठा करण्याची सक्ती केली जाईल, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, बेळगाव शहरालगत असलेल्या कंग्राळी केएच आणि कंग्राळी बीके गावांना हिडकल धरणातून पाणीपुरवठा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. (बाइट)
बेल्लारी कालव्याच्या विस्तारीकरणाची मागणी अनेक दिवसांपासून ऐकू येत आहे. मात्र समस्या तात्पुरती सोडवली जात आहे. जलवाहिनी विस्तारासाठी काही अडथळे असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच बेळगाव दक्षिण मतदारसंघात निर्माण झालेल्या नव्या वसाहतींचा प्रश्न महापालिकेसोबत मिळून सोडवावा. फक्त अधिकृत वसाहतींना परवानगी दिली पाहिजे. यावर लक्ष ठेवण्यासाठी स्क्वाड टीम तयार करावी. सरकारी शाळांचीही दुरवस्था झाली आहे. अत्यंत मोडकळीस आलेल्या इमारती पाडून त्या जागी नव्या इमारती बांधण्यात येत आहेत . . सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुमारे 100 नवीन इमारती बांधल्या जात आहेत.
निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ फेरबदलाचे काम हायकमांडवर सोडल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजप चारशे पार करणार नाही . आणि त्यामुळेच ते दररोज आपली वक्तव्ये बदलत आहेत. यावेळी उत्तरचे आमदार आसिफ सेठ, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्यासह काँग्रेसचे नेते व पदाधिकारी सहभागी झाले होते.


Recent Comments