बैलहोंगल तालुक्यातील वककुंद गावात दरवर्षीप्रमाणे या वर्षीही शनिवारी श्री मरडी बसवेश्वर रथोत्सव साजरा करण्यात आला.

सकाळी भगवान मरडी बसवेश्वरांना अभिषेक आणि विशेष पूजा करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत रथोत्सव, पालखी मिरवणूक , जोरदार पाऊस असतानाही यशस्वीपणे पार पडली. मारुती मंदिर रोडवरून बुधवार पेठ पर्यंत जाऊन पुन्हा गावात येऊन रथोत्सवाची सांगता झाली. तरुण-तरुणींनी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने रथ ओढला.

भाविकांनी रथावर , केळी आणि खारीक फेकून आपल्या मनोकामना पूर्ण होवोत अशी प्रार्थना केली. नंतर गावातील हायस्कूल प्रांगणातील के.डी.नदाफ नाट्यगृहात मलप्रभा तरुण नाट्य संघातर्फे नाटक सादर करण्यात आले.


Recent Comments