चिक्कोडी लोकसभा मतदारसंघांतर्गत कागवाड विधानसभा मतदारसंघातील 222 मतदान केंद्रांवर 2 लाख 5 हजार मतदार मतदान करणार असून त्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे.अशी माहिती कागवाड मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी सत्यप्पा पुजारी यांनी इन न्यूज वाहिनीशी बोलताना दिली .

सोमवारी कागवाड शिवानंद महाविद्यालयातील मतदान प्रक्रियेसाठी लागणारी सर्व मतदान यंत्रे व इतर साहित्य तपासून निवडणूक कर्मचाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले, प्रत्येक मतदान केंद्राच्या सर्व 1088 कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारच्या सूचना देण्यात आल्या. दुपारी सर्व कर्मचाऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांना बसमधून मतदान केंद्रावर पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कागवाड मतदान केंद्रात आठ विशेष मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून त्यात महिलांसाठी पाच सखी मतदान केंद्रे,शेडबाळ , ऐनापूर , किरंगी व इतर गावांमध्ये, प्रथमच मतदारांसाठी एक स्वतंत्र मतदान केंद्र आणि दिव्यांगांसाठी दोन, निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

सायंकाळी सर्व 1088 कर्मचाऱ्यांना कागवाड शिवानंद महाविद्यालयातून मतदान केंद्राच्या 222 मतदान केंद्रांवर रवाना करण्यात आले.
सहायक निवडणूक अधिकारी तथा कागवड तहसीलदार एस. बी. इंगळे, तालुका पंचायत अधिकारी जयप्रकाश आदींसह अनेकांची उपस्थिती होती.


Recent Comments