हुक्केरी व यमकनमर्डी या सहाय्यक निवडणूक अधिकारी रेखा डोल्लनवर व बसवनप्पा कलशेट्टी यांनी सांगितले की, हुक्केरी तालुक्यातील यमकनमर्डी व हुक्केरी मतदान केंद्रावर उद्या होणाऱ्या मतदानासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे.

आज हुक्केरी शहरातील एस.के.हायस्कूलच्या मैदानावर महसूल विभाग,पोलीस विभाग व विविध विभागांचे निवडणूक अधिकारी एकत्र येऊन मतदानाचे साहित्य घेऊन नियोजित मतदान केंद्रावर गेल्याचे चित्र आज पहावयास मिळाले. माध्यमांशी बोलताना सहाय्यक निवडणूक अधिकारी रेखा डोल्लनवर म्हणाल्या की, हुक्केरी तालुक्यात निवडणुकीसाठी नेमलेले कर्मचारी ईव्ही मशिन व साहित्य घेवून नेमलेल्या वाहनातून कर्तव्यावर हजर होत आहेत.

बेळगावचे विभागीय अधिकारी आणि यमकनमर्डी सहाय्यक निवडणूक अधिकारी बसवनप्पा कलशेट्टी यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेवेळी करावयाच्या मुख्य मुद्यांची माहिती दिली.
यावेळी तहसीलदार बाळाराम कट्टीमणी, भूमी कार्यालयाचे अधिकारी शशिकांत हेगडे, बीईओ प्रभावती पाटील, सविता हलकी, प्रभाकर कामत, एस.आर.घस्ती आदी उपस्थित होते. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिस कर्मचाऱ्यांसह एक ईव्ही मशीन पाठविण्यात आले.


Recent Comments