Hukkeri

व्होट बँकेसाठी काँग्रेस नेते अयोध्येत आले नाहीत :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आरोप

Share

रायबरेली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उमेदवारी देण्याचा सोनिया गांधींचा डाव यशस्वी होणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी हुक्केरी भाजप अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना “माझे प्रिय मित्र अण्णासाहेब जोल्ले, कडक उन्हात तुम्हाला उभे राहावे लागले , तुमच्याकडे उशीरा आल्याबद्दल मी माफी मागतो” असे म्हणत भाषणाला सुरुवात केली.

अमित शहा यांना होलेम्मा देवी, यल्लम्मा देवी यांचे स्मरण केले . हिंदू धर्माची स्थापना करणाऱ्या शिवाजी महाराजांचे स्मरण करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो . . अयोध्येत चिक्कोडी आणि कर्नाटकातील लोकांचीही भूमिका असायला हवी होती. काँग्रेस पक्ष गेल्या 70 वर्षांपासून राम मंदिराचा मुद्दा लावून धरत आहे. राहुल बाबा ,खर्गे आमंत्रण देऊनही श्री रॅम प्राणप्रतिष्ठाने साठी आले नाहीत, ते त्यांच्या वोटबँकेसाठी अयोध्येत आले नाहीत. त्यांना व्होटबँकेची काळजी वाटत आहे असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्याच प्रयत्नात चांद्रयान मोहीम यशस्वी झाली. दुसरीकडे, सोनिया गांधी यांनी राहुल बाबांना (राहुल गांधींना उद्देशून) 20 वेळा प्रयत्न केले आहेत. पण उड्डाण यशस्वी झाले नाही. आता ते अमेठीतून पळून गेले आणि 21व्यांदा रायबरेलीमधून उमेदवारी दाखल केली,’ असे ते म्हणाले. ‘राहुलबाबा, मी इथून निकाल जाहीर करेन. “रायबरेलीत भाजप उमेदवार दिनेश प्रताप यांच्या विरोधात राहुल गांधी मोठ्या फरकाने पराभूत होतील,” असे ते म्हणाले.

हुक्केरी भाजपच्या अधिवेशनाला आमदार निखिल कत्ती , खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.

Tags: