सर्वच मतदारसंघ जारकीहोळी घराण्याकरिता राखीव असतील तर धनगर, लिंगायत यासह अन्य समुदायाच्या नेत्यांनी काय करायचे?, असा सवाल बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी केला.

भाजपचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रचारादरम्यान बोलताना यत्नाळ यांनी, चिकोडीत भाजप उमेदवाराला जनतेचा पाठिंबा वाढत आहे. अगदी काँग्रेस नेत्यांनीही भाजपचे अण्णासाहेब जोल्ले यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे, असा दावा केला.
प्रत्येक निवडणुकीत जातीचे विष पेरणाऱ्या काँग्रेस पक्षाला योग्य धडा शिकवायला हवा, त्यांचा जाहीरनामा म्हणजे मुस्लिम लीगचा जाहीरनामा आहे, असे मोदींनीच म्हटले आहे. स्वातंत्र्यानंतर नेहरूंच्या घोडचूकांमुळे देशात अराजक माजल्याचा आरोप त्यांनी केला. जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 लागू करण्यात आले होते पण पंतप्रधान मोदींनी ते रद्द केले आणि भारत आणि सनातन धर्माच्या अस्तित्वासाठी मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे, असे सांगितले.


Recent Comments