Chikkodi

हिरेकोडी जि .पं.च्या अधिक विकासासाठी प्रियंका जारकीहोळी यांना मतदान करा: प्रकाश हुक्केरी

Share

हिरेकोडी जिल्हा पंचायत सर्वांगीण विकासासाठी झटत आहे.त्यामुळे पुढील विकासासाठी आमच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांना मतदान करा, असे सरकारचे दिल्लीचे विशेष प्रतिनिधी व विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी सांगितले.

हिरेकोडी जिल्हा पंचायत निवडणूक अंतर्गत चिक्कोडी तालुक्यातील नेज गावात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सभेत चिक्कोडी लोकसभा निवडणुकीच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते . मी नेज गावात खूप विकासकामे केली आहेत.कार्यकर्ते माझे गुरू आहेत. जोपयंत मी राजकारणात असेपर्यंत जनतेची सेवा करत राहीन. काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी याना तुमचे मत द्या. येडूर , कल्लोळ पुलाचे काम पूर्ण झाल्यावर 12 महिने नेज तलावात पाणी सोडू असे ते म्हणाले .

त्यानंतर माजी जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख टाकले आणि दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्माण करणार असल्याचे खोटे बोलले. त्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवून या देशात जातीचे विष पेरून देशात असंतोष निर्माण केला आहे.काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे.कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने लागू केलेले पाच हमीभाव जनतेच्या हिताचे आहेत. या पार्श्वभूमीवर आमच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांना मत द्या आणि विजयी करा,” असे आवाहन त्यांनी केले .

सदलगा ब्लॉक अध्यक्ष अनिला पाटील म्हणाले की, चिक्कोडी-सदलगा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांना अधिकाधिक मते देऊन विजयी करा. देशातील भाजप सरकार हे जनविरोधी सरकार आहे. गेल्या 10 वर्षांपासून देशात कोणताही विकास झालेला नाही. भाजप पक्ष हिंदू-मुस्लिम यांच्यात संघर्ष निर्माण करण्याचे काम करत असून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला

यावेळी राजू पाटील, मल्लू हवालदार, पुंडलिक खोत, अण्णासाहेब मगदुम्म, ग्रामपंचायत अध्यक्षा अमृता राजगौडा पाटील, उपाध्यक्ष सुलोचना, अजयसिंह शितोळे सरकार, प्रकाश मगदुम्म, अरुण बोणे, रमेश पाटील, निरंजन कांबळे, बबन्ना खोत, अप्पू सुट्टे, शकेल सुतई सुनिल महिपती.यासह इतर उपस्थित होते.

Tags: