Hukkeri

हिडकल धरणाजवळ 1 लाखांहून अधिक बेहिशेबी रक्कम जप्त

Share

हुक्केरी तालुक्यातील हिडकल धरणाजवळ विना कागदपत्रे नेण्यात येणारी १ लाख ३८ हजार २४० रुपये रक्कम निवडणूक अधिकाऱ्यांनी जप्त केली .

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक निरीक्षक बी.आर.रायवगोळ व पोलीस कर्मचारी हदीमनी हिडकल धरणाजवळ वाहनांची तपासणी करत असताना , महाराष्ट्रातील आजरा येथून हिडकल धरणाकडे येणाऱ्या एमएच 09 एल 0889 क्रमांकाच्या आयशर लॉरीची तपासणी केली असता एक लाख अडतीस हजार दोनशे चाळीस रुपयांचा जप्त करण्यात आले .

ह्या रकमेसंदर्भात कोणतीही कागदपत्रे सादर करण्यात न आल्याने , मॉडेल कोड ऍपचे निवडणूक अधिकारी डी.बसवराजू यांनी लॉरी चालक इरफान मैनुद्दीन हुंडेकर विरुद्ध गुन्हा दाखल केला.

Tags: