हुक्केरी तालुक्यातील हिटणी चेकपोस्टवर निवडणूक कर्मचाऱ्यांनी बेहिशेबी 1 लाख 10 हजार रुपये जप्त केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हुक्केरी तालुक्यातील महाराष्ट्र सीमेवरील हिटणी येथे उभारण्यात आलेल्या चेकपोस्टवर निवडणूक अधिकारी डी बसवराजू यांनी टोयोटा फॉर्च्युनर वाहन क्रमांक एमएच-०३, सीएम १८२९ मधून नेण्यात येत असलेली बेहिशेबी रक्कम जप्त केली.
सहाय्यक निवडणूक अधिकारी श्रीमती रेखा डोलानवार यांनी घटनास्थळी पोहोचून जप्त केलेली ताब्यात घेतली व वाहनातून प्रवास करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. यावेळी संकेश्वरचे पोलीस निरीक्षक शिवशरण अवूजी व निवडणूक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
राजू बागलकोटी, इन न्यूज, हुक्केरी.


Recent Comments