Chikkodi

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिक्कोडी पोलीस विभागाकडून रूटमार्च

Share

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज चिक्कोडी शहरात रूटमार्च केले . .

चिक्कोडीचे पोलिस उपअधीक्षक गोपालकृष्ण गौडा यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चिक्कोडी शहर बसस्थानक, केसी रोड, गुरुवार पेठ, जैन पेठ, ओतारी गल्ली, वडगल्ली, नगर परिषद चौक ते केशव कला भवन असा रूटमार्च केला .

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी हे रूट मार्च केले . यावेळी चिक्कोडी पीएसआय सचिन दासरेड्डी व चिक्कोडी पोलिस व राखीव पोलिस तुकड्यांचे पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.

Tags: