हुक्केरी मतदारसंघाच्या लोकसभा निवडणूक अधिकारीरेखा डोलनवर म्हणाल्या की, प्रत्येकाने मतदान करून आपला हक्क बजावला पाहिजे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज हुक्केरी तालुका पंचायत परिसरात मतदान जागृती रॅलीला हिरवे निशाण दाखवून रॅलीचा शुभारंभ केल्यानंतर त्या बोलत होत्या .

प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या कि, बेळगाव जिल्हा पंचायत, तालुका पंचायत हुक्केरी आणि नगरपरिषद यांच्या वतीने , २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान मतदान व्हावे यासाठी कार्यवाही करण्यासाठी मतदारांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. यासाठी या जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे . यावेळी ८५ वर्षावरील वृद्ध मतदार तसेच दिव्यांग मतदारांना घरातूनच मतदान करण्याची सोय करण्यात आली आहे . १८ वर्ष पूर्ण झालेल्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन त्यांनी केले .

आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी हुक्केरी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी मल्लद यांनी सांगितले. माझे मतदान माझा अधिकार असे घोषवाक्य तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले .
यावेळी तालुका पंचायत व्यवस्थापक अविनाश होलेप्पगोल, शेखर धंग, महांतेश नाईक, नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंभुलिंग खन्ने, डी.बी.नवले, बसवराज खिल्लारे, एस.आर.करणिंग यांच्यासह विविध ग्रामपंचायत विकास अधिकारी व दिव्यांग तीनचाकी स्वार उपस्थित होते.


Recent Comments