भाजप नेते जगदीश शेट्टर यांच्या विरोधात लावलेल्या अवमानकारक पोस्टर्सचा भाजप महानगर जिल्हा शाखेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून गीता सुतार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि शहर पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे.
बाहेरच्या लोकांनी बेळगावात येऊ नये, काही लोकांनी स्थानिक उमेदवारांना तिकीट देण्यासाठी ‘गो बॅग शेट्टर’ अभियान सुरू केले आहे. कालपासून तर त्यांच्या विरोधात बॅनरबाजीही सुरु करण्यात आली आहे. ‘शेट्टर या, जेवण करून जा’, ‘बेळगाव तुमच्यासाठी सोडून दिले आहे का? असे बॅनर शहरात लावण्यात आले आहेत.
शेट्टर यांच्याबाबत अवहेलनाकरी मजकुराच्या बॅनरमुळे खजील झालेल्या बेळगाव भाजप नेत्यांनी याचा तीव्र निषेध केला आहे. भाजप महानगर जिल्हा शाखेच्या नेतुत्वाखाली आज याविरोधात जिल्हाधिकारी नितेश पाटील तसेच पोलीस आयुक्त इडा मार्टिन मार्बानियांग यांना निवेदन देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.
यावेळी भाजप महानगर जिल्हाध्यक्षा गीता सुतार, नगरसेवक राजशेखर डोणी, शिल्पा केकरे यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments